उत्पादनांच्या वाहतुकीसाठी एलएनजीवर चालणारे ट्रेलर्स; खोपोली येथून वाहनांना दाखवला हिरवा झेंडा……. 

[avatar]

उत्पादनांच्या वाहतुकीसाठी एलएनजीवर चालणारे ट्रेलर्स; खोपोली येथून वाहनांना दाखवला हिरवा झेंडा…….

पनवेल (प्रतिनिधी)  टाटा स्टीलने आपल्या खोपोली डाऊन स्ट्रीम प्लान्ट मधून तयार उत्पादनांच्या पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एलएनजीवर चालणारे दोन ट्रेलर्स तैनात केले आहेत. लिक्विफाईड नॅचरल गॅसवर (एलएनजी) चालणारे ट्रेलर्स वापरून आपल्या पुरवठा शृंखलेमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करून अधिक शुद्ध वाहतुकीचे पर्याय स्वीकारले जावेत हा कंपनीचा उद्देश आहे. टाटास्टीलचे एक्झिक्युटिव्ह प्लान्ट हेड (खोपोली आणि होसूर) कपिल मोदी यांनी खोपोली येथील कोल्ड रोलिंग मिल मधून (सीआरएम) वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी प्लान्टचे लॉजिस्टिक्स पार्टनर, ग्रीन लाईन मोबिलिटी सोल्युशन्स लिमिटेडचे सीईओ आनंद मिमानी हे देखील उपस्थित होते.

       सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि व्यवसायाला फायदेशीर ठरतील अशा पर्यावरणपूरक उपाययोजना करून हरित भविष्याच्या निर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी टाटास्टील वचनबद्ध आहे. खोपोली प्लान्टमधून या शुद्ध इंधन वाहनांमधून नागपूर आणि राजगुरूनगर (पुणे) येथे ८०० टन कलर कोटिंग आणि कोल्डरोल्डक्लोज्डअनील्ड (सीआरसीए) सामग्री पाठवण्याचा कंपनीचा उद्देश आहे.

टाटास्टीलचे एक्झिक्युटिव्ह प्लान्टहेड (खोपोली आणि होसूर) कपिलमोदीयांनीसांगितले, “अधिकाधिक पर्यावरणपूरक स्टील उत्पादक बनण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्ये आम्ही अजून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एलएनजीवर चालणारे ट्रेलर्स तैनात करून आम्ही फक्त कार्बन फूटप्रिंट कमी करत नाही आहोत तर, आमच्या लॉजिस्टिक्स ऑपरेशन्समध्ये अधिक हरित भवितव्याचा पाया मजबूत करत आहोत.” कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि पुरवठा शृंखलेमध्ये स्कोप३ उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शुद्ध वाहतूक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी टाटास्टीलने सक्रिय दृष्टिकोन स्वीकारला आहे. तयार स्टीलच्या वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणारी ही देशातील पहिली स्टील उत्पादक कंपनी होती. २०२१ साली टाटास्टीलने एका भारतीय स्टार्ट-अप सोबत भागीदारी करून स्टील वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केली. टास्टीलला टाटामोटर्सकडून अत्याधुनिक, हरित इंधनावर चालणाऱ्याकमर्शियलवाहनांचीपहिलीबॅचमिळाली. यामध्येप्रायमाट्रॅक्टर-ट्रेलर्स, टीपर्स आणि अल्ट्राइव्हीबस यांचा समावेश असून, ही सर्व वाहने कमी उत्सर्जन करणाऱ्या आणि उत्सर्जन-मुक्त तंत्रज्ञानांवर म्हणजे एलएनजी इलेक्ट्रिक बॅटरीवर चालतात.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close