वन विभागातर्फे मुरुड व चणेरा येथे जागतिक पर्यावरणदिन साजरा……. 

[avatar]

वन विभागातर्फे मुरुड व चणेरा येथे जागतिक पर्यावरणदिन साजरा…….

कोर्लई(राजीव नेवासेकर) शासनाच्या वन विभागातर्फे मुरुड व रोहा तालुक्यातील चणेरा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जागतिक पर्यावरण दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.याचाच भाग मुरुड तसेच रोहा तालुक्यातील चणेरा येथे यादिवशी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वनविभागाचे चणेरा येथील वनपाल आर.जी.गायकवाड, वनरक्षक गोविंद खेडकर,त्रिभूवन,वनपाल विलास वाघमारे (सुडकोली), मुरुड वनपाल संतोष रेवणे, वनमजूर दिलिप पवार,, दिनेश रोटकर, अनिल चोरघे व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close