“रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…… 

[avatar]

“रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा……

मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या मार्गदर्शक तत्वाना अनुसरुन रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश योग ज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये जनजागृती करणे व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आतंरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करणे हा होता.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हयातील विविध महाविद्यालयांमध्ये योग मार्गदर्शनपर कार्यशाळा, योग प्रात्यक्षिके, प्रभात फेऱ्या, व्याख्याने, भितीपत्रक स्पर्धा, प्रतिज्ञा, कुटुंबा सोबत योग प्रात्यक्षिक फोटो आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांत रायगड जिल्ह्यातील हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाविद्यालय महाड, शिक्षणं महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालय कळंबोली, डी.डी. विसपुते महाविद्यालय पनवेल. पिल्लई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,पनवेल.टीकमभाई मेहता महाविद्यालय माणगाव, मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालय,नेरळ. डी.जी. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा.गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन.के.एल.ई महाविद्यालय कळंबोली.को. ए.सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय नागोठणे, महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पनवेल. जी.एम. वेदक विज्ञान महाविद्यालय तळा.शेठ जे.एन. पालीवाला महाविद्यालय पाली.बार्न्स महाविद्यालय पनवेल,को. ए . सो.लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालय पेझारी.के.जी.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय उरण.उरण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी उरण. जी.एम. वेदक अभियांत्रिकी महाविद्यालय तळा.जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग.को.ए. सो.डॉ.सी.डी. देशमुख महाविद्यालय रोहा, वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुड. अंजुमन इस्लाम डिग्री महाविद्यालय मुरुड. पिल्लई एच.ओ.सी.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रसायनी.
एम.बी.मोरे महिला महाविद्यालय धाटाव.सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर. सी. के. टी.महाविद्यालय पनवेल, वीर वाझेकर महाविद्यालय उरण, कोकण ज्ञानपीठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कर्जत,
कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालय कर्जत या महाविद्यालयाने सक्रिय सहभाग घेतला होता.
रायगड जिल्ह्यातील विविध
महाविद्यालयाने हा उपक्रम यशस्वी केल्या बद्दल राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक,कार्यक्रम अधिकारी, विभागीय समन्वयक व सर्व महाविद्यालयांचे मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विशेष कार्य अधिकारी प्रा. सुशील शिंदे, विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रमेश देवकर, रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल आदींनी
कौतुक केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close