पनवेलमध्ये  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती…… 

[avatar]

पनवेलमध्ये  आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती……

पनवेल (प्रतिनिधी)  आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या वतीने वडाळे तलावाजवळ भव्य स्वरूपात योग दिवस साजरा करण्यात आला. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पतंजली योग समितीचे भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने आणि प्राणायम, ध्यान याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यानी सहभागी होत योगासने केली. भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्व होते. योगामुळे शरीर, मन दोन्हीही सुदृढ बनते. 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली. २१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिवस’ जगभर साजरा करण्यात आला. केवळ भारत देशातच नाही तर साऱ्या जगाला आता योगाचे महत्व पटले आहे. त्या अनुषंगाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार पनवेल महापालिकेच्यावतीने वडाळे तलावाजवळ हा दिन साजरा केला. या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी पंतजली योग समितीचे राम पलट यादव यांनी अर्ध चक्रासन, ताडासन, वक्रासन, भुजंगासन, पवन मुक्तासन, अर्ध हलासन असे आसानाचे विविध प्रकार शिकवून त्याचे फायदे सांगितले. तसेच प्राणायमामध्ये कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम याबद्दल मार्गर्शन केले. याबरोबरच ध्यानामुळे शरीराला होणाऱ्या लाभाबद्दल सविस्तर माहिती दिली.
         यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, संदीप पाटील, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, घनकचरा आणि स्वच्छता विभागप्रमुख अनिल कोकरे, भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाप्रमुख रामबाबू मोरे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रविंद्र मोरे, पतंजली योग समितीचे योग संदेश प्रभारी अल्का अव्हाड, पतंजली योग समितीच्या महामंत्री सरिता ठाकूर, भारत स्वाभिमान ट्रस्टचे सह जिल्हा प्रभारी राजेंद्र सिंह, पनवेल बम्हकुमारीजच्या इनचार्ज तारावेन डॉक्टर शुभदा नील, महिला मोर्चाच्या सपना पाटील, आर.पी. यादव, डॉ. शुभदा नील, डॉक्टर समुद्रे, श्वेता शेट्टी, युवामोर्चा युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अक्षय सिंग, वरुण डांगर, शुभम कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.  दरम्यान योग दिनाचे औचित्य साधून स्वच्छ, सुंदर आणि सदृढ पनवेल बनविण्याच्या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत घनकचरा आणि आरोग्य विभाग, माझी वसुंधरा अंतर्गत गारबेज टू गार्डन, झिरो वेस्ट, गांडूळ खत, कंपोस्टींग, ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण अशा विविध प्रकारची माहिती देणारे प्रात्यक्षिके मांडण्यात आली होती. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या स्टॉलला भेट देऊन पालिका करत असलेल्या कामाची माहिती घेतली. तसेच भारत विकास परिषदेकडून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close