बारापाडा गावातील भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची देणगी…… 

[avatar]

बारापाडा गावातील भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची देणगी……

पनवेल (प्रतिनिधी) बारापाडा गावातील भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची देणगी दिली. यापूर्वी या मंदिराचे काम सुरु होतानाही त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. 

          बारापाडा गावात भवानी मातेच्या मंदिराचा जिर्णोद्धार व मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार व रविवारी पार पडला. या मंदिरास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी सदिच्छा भेट देत दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांनी उर्वरित कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या देणगीची मागणी केली होती. मात्र नेहमीच सढळ हस्ते मदतीचा हात देणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा जास्त म्हणजेच दोन लाख रुपयांऐवजी अडीच लाख रुपयांची देणगी या मंदिराच्या कामासाठी दिली. त्याबद्दल यावेळी ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर याचे मनःपूर्वक आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ठाकूर इंफ्राप्रोजेक्टचे संचालक अमोघ ठाकूर, भाजपचे युवा कार्यकर्ते विद्याधर जोशी, दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश पाटील, लक्ष्मण गावंड, महेश पाटील, सुनील गावंड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close