जयंत पाटलांवरुन काँग्रेसमध्ये दोन गट? उध्दव ठाकरेंनी दिला होता आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा…..

[avatar]
मुंबई(विशेष प्रतिनिधी) विधानपरिषद निवडणुकीत शेकाप नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. मात्र त्यांना मतदान करण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते असे वृत एका खाजगी वाहीनीने दिले आहे. नार्वेकरांसोबत दगाफटका होईल, अशी भीती ठाकरेंना वाटत होती. या वादावादीत जर निकाल विरोधात गेला तर मविआ सोडण्याची धमकी उद्धव ठाकरे यांनी दिली होती.
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र, या निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना ठाकरे गटाचे 16 आमदार होते. विजयासाठी 23 मतांची गरज होती. उर्वरित 7 मतांसाठी नार्वेकर काँग्रेसच्या अतिरिक्त मतांवर अवलंबून होते. ही मते पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
MUMBAI
मिलिंद नार्वेकरांना मते द्यायची की, शेकापच्या जयंत पाटलांना? यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले. पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नाना पटोलेंनी ठाकरेंच्या बाजूने कौल दिला तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जयंत पाटलांना मते देण्याच्या बाजूने होते. ज्या 8 आमदारांचा कोटा काँग्रेसने ठरवून दिला त्या आमदारांवर ठाकरेंचा विश्वास नव्हता. ते आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि नार्वेकरांना दगाफटका होईल, अशी भीती ठाकरेंना वाटत होती.
ठाकरेंच्या शिवसेनेने पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, ऋतुराज पाटील, अमित देशमुख, धीरज देशमुख आणि अस्लम शेख या 8 आमदारांची यादी दिली. मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली.
या बैठकीत जोरदार वादावादी झाली. निकाल विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिली. मतदानाच्या आदल्या रात्री शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्यासाठी अनेकदा फोन केले. मात्र, उद्धव ठाकरे पवारांसाठी नॉट रिचेबल राहिले, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
..अखेर शिवसेना ठाकरे गटाला ज्याची भीती होती, तेच घडले… काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार पराभूत झाले. ठाकरे गटाचे नार्वेकर आमदार म्हणून विजयी झाले… मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतल्या एकीला तडे गेल्याचे लपून राहीले नाही.दरम्यान, महाविकास आघाडीत कसलीही धुसफूस नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close