कोकबण धाविर मंदिरातील दान पेटी चोरीचा धक्कादायक प्रकार!अज्ञाताविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

[avatar]

कोकबण धाविर मंदिरातील दान पेटी चोरीचा धक्कादायक प्रकार!अज्ञाताविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

रोहा(शहानवाज मुकादम) रोहा : तालुक्यातील कोकबण येथे धाविर मंदिरातील दान पेटी चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आसुन अज्ञाताविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज मंगळवार दिनांक १६ जुलै २०२४ रोजी सकाळी ०६ च्या सुमारास कोकबण येथील धाविर मंदिरातील लोखंडी दान पेटी चोरून अंदाजे पाच हजार रुपयांच्या चलनी नोटा व काही चिल्लर आणी पाचशे रुपयांपर्यंत किमतीचे तांब्याचे ताट अज्ञात चोराने चोरून नेण्याचा प्रकार कोकबण येथील धाविर मंदिरात घडला आहे.

मंगळवारी पहाटे सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आला आस्ता फिर्यादी अमर मोकल वय ४२ वर्ष, रा. कोकबण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध कॉ.गु.र.नं.-१४६/२०२४ भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ३०५ (ड) प्रमाणे रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दानपेटीमध्ये (५०००/-) पाच हजार रुपयांची रोकड व ५००/- रुपये किंमतीचे तांब्याचे ताट असे एकूण ५५००/- रुपयांचे चोरीत गेलेल्या मुद्दे माल असल्याचे पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार महेंद्र शिद पुढील तपास करीत आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close