पराभवानंतर पहिल्यांदाच शेकापक्ष भवनात साधला कार्यकर्त्यांशी संवाद!!! शेकापक्ष इतिहास घडवेल-जयंत पाटील……. 

[avatar]

पराभवानंतर पहिल्यांदाच शेकापक्ष भवनात साधला कार्यकर्त्यांशी संवाद!!! शेकापक्ष इतिहास घडवेल-जयंत पाटील…….

अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाच्या भवनात जयंत पाटील यांनी पराभवानंतर पहिल्यांदाच साधला कार्यकर्त्यांशी संवाद.शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. पराभवाने खचणारा नाही. कष्टकरी कामगारांसाठी लढणारा, कायम आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ असणाऱ्या शेकापक्षाची भुमिका आणि धोरणे वेगळी आहेत.जिल्ह्यात, राज्यात शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे.

विरोधी पक्षनेता म्हणून आजही शेकापला मान-सन्मान आहे, ही ओळख पुन्हा आपल्याला निर्माण करायची आहे.
आगामी काळात खचून न जाता नव्या उमेदीनं काम करु, निवडणूकीत विजय मिळवून एक वेगळा इतिहास निर्माण करायचा आहे.
यावेळी माजी आ. पंडित शेठ पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापक्ष जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, माजी सदस्य संजय पाटील, तालुका शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close