वाघ आला रे वाघ आला …. अफवांवर विश्वास ठेवू नका – फॉरेस्ट ऑफिसर दादासाहेब कुकडे….. तो व्हीडीओ आपल्या कडचा नाही ; नागरिकांनी घाबरू नये…..

[avatar]

वाघ आला रे वाघ आला …. अफवांवर विश्वास ठेवू नका – फॉरेस्ट ऑफिसर दादासाहेब कुकडे….. तो व्हीडीओ आपल्या कडचा नाही ; नागरिकांनी घाबरू नये…..

नागोठणे(महेंद्र माने) येथील विभागात रविवार 21 जुलै रोजी सकाळपासून गायीला एक बिबट्या ओढून नेत असल्याचा व्हीडीओ व्हाट्सअप्प ग्रुपवर फिरत आहे.सदरील व्हीडीओ आपल्या कडचा नसून नागरिकांनी घाबरून जाऊन अफवांवर विश्वास ठेवू नये.असे आवाहन नागोठणे रेंज फॉरेस्ट ऑफिसर दादासाहेब कुकडे यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना दादासाहेब कुकडे यांनी सांगितले की, सकाळपासून नागोठणे शहर व परिसरात व्हाट्सअप्प ग्रुपवर फिरत असलेला एका गायीला एक बिबट्या रस्त्याच्या बाजूला ओढून नेत असल्याचा व्हीडीओ फिरत असून त्याखाली सदरील व्हीडीओ हा नागोठणे रोहा रस्त्यावरील भिसे खिंडीतला असल्याने मोटारसायकल चालकांनी सावध राहावे. या व्हीडीओ मुळे शहर व परिसरात वाहन चालकांमध्ये घबराट पसरली असून ते भीतीच्या छायेत आहेत.

सदरील व्हीडीओची पडताळणी केली असता. व्हीडीओमध्ये दिसणारा सफेद पट्टे असलेला रस्ता भिसे खिंडीतला नसून तो अन्य कोणत्या तरी ठिकाणचा असल्याने अशा कोणत्याही व्हीडीओवर लगेच व येणार्‍या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे सांगून काही अडचणी असतील तर फॉरेस्ट कार्यालयात किंवा अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन शेवटी दादासाहेब कुकडे यांनी केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close