पेण कासू येथील तन्वी तांडेल चे एमबीबीएस मध्ये यश……

[avatar]

पेण कासू येथील तन्वी तांडेल चे एमबीबीएस मध्ये यश……

रायगड(रत्नाकर पाटील) पेण तालुक्यातील कासू- बुर्दी ह्या गावातील अंजली वासुदेव ह्यांची मुलगी तन्वी वासुदेव तांडेल ही खडतर परिस्थितिला मात देऊन चांगल्या गुणांनी पहिल्या प्रयत्नात रशिया मध्ये एमबीबीएस परीक्षेत पास झाली.
तांडेल कुटुंबीय मध्ये ही पहिली एमबीबीएस डॉक्टर झाली.तिच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
रशिया कीगिजस्तान इथून तिने एमबीबीएस ची पाच वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
तन्वी वासुदेव तांडेल ही लहानपणा पासून हुशार होती. तिने आपल्या बिकट परिस्थितीवर मात करून रशिया सारख्या देशात शिक्षण घेऊन हे उज्वलं यश प्राप्त केले.

तन्वी तांडेल हिचे या यशा बद्दल आगरी साहित्य व संस्कृती सामाजिक विकास मंडळ अलिबाग ,रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशन,प्रेस संपादक पत्रकार संघ रायगड, श्री समर्थ विचार फाऊंडेशन रायगड, रयत सामाजिक सस्था रायगड, प्रथा फाऊंडेशन अलिबाग च्या वतीने तिचे गौरव करण्यात आले आहे. तिच्या या यशा बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जातं आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close