रोहेकर प्रवाशांच्या रोहा दिवा मेमु ची वेळ बदलाच्या मागणी ला भाजपा रोहे शहराच्या पाठपुराव्या ला यश…. 

[avatar]

रोहेकर प्रवाशांच्या रोहा दिवा मेमु ची वेळ बदलाच्या मागणी ला भाजपा रोहे शहराच्या पाठपुराव्या ला यश….

रोहा(संतोष सातपुते)समस्त रोहेकर प्रवाशांच्या मागणीवरून व भाजपा रोहे शहराच्या पाठपुराव्यामुळे १६:४० वा. सुटणारी रोहा दिवा पॅसेंजर गाडी आज दि. २० जुलै २०२४ पासून मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १५:५५ वा. रोहे स्थानकातून सुटली. आजपासून प्रवाशांच्या वेळेची बचत होईल व प्रवासी इच्छित स्थळी वेळेवर पोहोचतील यामुळे रोहेकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे असे भाजपा शहर अध्यक्ष व रोहा रेल्वे स्थानक सल्लागार समिती सदस्य यज्ञेशजी भांड यांनी सांगितले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष वसंतराव शेलार, सल्लागार विनायक बेडेकर, उप शहराध्यक्ष उमेश शेडगे, तालुका चिटणीस दिनकर खरिवले, शशीकांत बोंडकर, दादा कुलकर्णी तसेच भाजपा ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते रोहे स्थानकात उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close