आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा पुरविण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटल्सची सेनेगल, पश्चिम आफ्रिकेतील प्रतिनिधींसोबत हातमिळवणी…… 

[avatar]

आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा पुरविण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटल्सची सेनेगल, पश्चिम आफ्रिकेतील प्रतिनिधींसोबत हातमिळवणी……

नवी मुंबई: रुग्णसेवेचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मेडिकवर हॉस्पिटल्सने सेनेगल, पश्चिम आफ्रिकेतील प्रतिनिधींच्या टीमसोबत हातमिळवणी केली आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर टेलिहेल्थ सोल्यूशन्स, वैद्यकीय तज्ञांचा सल्ला, सेकंड ओपीनीयन, संशोधन आणि नवनवीन कल्पना तसेच सर्जिकल शिबिरांद्वारे रुग्णांना उत्तमोत्तम वैद्यकिय सेवा पुरविल्या जाणार आहे. रुग्णांसाठी दर्जेदार उपचार आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी याची नक्कीच मदत होईल.

13 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान, मेडिकवर हॉस्पिटलने सेनेगलमधील प्रतिनिधींसोबत हातमिळवणी केली. या प्रतिनिधींनी क्लिनिकल पद्धतींचे निरीक्षण करण्यासाठी, यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या कार्यक्रम, शस्त्रक्रिया तंत्र आणि नवकल्पनांचा शोध घेण्यासाठी आणि वैद्यकिय तज्ज्ञांशी संपर्क साधण्यासाठी हॉस्पिटलला भेट दिली. या रूग्ण-केंद्रित दृष्टिकोनाला प्राधान्य देताना रूग्णसेवेची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती, श्री श्रीकांत महेंद्रकर(ग्रुप हेड इंटरनॅशनल बिझनेस, मेडिकवर हॉस्पिटल्स) यांनी दिली.

जागतिक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. उपचारादरम्यान परिणामांमध्ये सुधारणा आणि क्षमता वाढवणे, तसेच उपचारांमधील सुलभता वाढवणे, किफायतशीर दरात उपाय प्रदान करणे आणि वैद्यकीय संशोधनात प्रगती करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. अत्याधुनिक टेलिहेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करून हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. वैद्यकीय मदत, सल्ला, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपचार पुरविण्या बरोबरच वैद्यकिय कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही हातमिळवणी करण्यात आली. दर्जेदार रुग्णसेवेसाठी सरकारी संस्था आणि आरोग्य सेवा संस्था रुग्णांना उच्चस्तरीय उपचार पर्याय पुरवत त्यांचे आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत करेल अशी प्रतिक्रिया सेनेगल प्रतिनिधी मंडळाच्या श्रीमती खाडी डायप यांनी स्पष्ट केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close