रोह्यात मोंडे परिवाराने गणरायाच्या भोवती आकर्षक दाखविला देखावा स्वयंभू श्री तीर्थक्षेत्र महादेव तळाघर यात्रेचे साकारली हुबेहूब प्रतिकृती….. 

[avatar]

रोह्यात मोंडे परिवाराने गणरायाच्या भोवती आकर्षक दाखविला देखावा स्वयंभू श्री तीर्थक्षेत्र महादेव तळाघर यात्रेचे साकारली हुबेहूब प्रतिकृती…..

रोहा (संतोष सातपुते)रोहा तालुक्यातील तळाघर गावातील मोंडे परिवाराच्या घरी दहा दिवसांच्या बाप्पा विराजमान झाला आहे. आकर्षित अशी सुबक आरास केली आहे . दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील नवीन सुंदर देखावा हा तळाघरच्या महादेवाची लग्न यात्रा त्यांनी दाखवला आहे .

दरम्यान देखावातून अतिशय विस्तृत अशी माहिती दाखवलेले आहे यामध्ये श्री क्षेत्र स्वयंभू महादेव मंदिर तळाघरची( महादेवाडी) यात्रा चैत्र महिन्यात दोन दिवस (दिवस/रात्र) भरते.या यात्रेचे वैशिष्ट्य पाहिले तर साक्षात भगवंताचा अर्थात शिव/पार्वतीचा लग्न सोहळा महाराष्ट्रात फक्त या यात्रेत पाहवयास मिळतो. तर इतिहास उलगडला तर असे लक्षात येते की शिवकालीन पेशवे -सिद्दि यांच्यामध्ये १७३३ मध्ये झालेल्या करारामध्ये या यात्रेची नोंद आहे .ग्रामीण भागातील संस्कृती जपण्यासाठी ही यात्रा चालु केल्याचा उल्लेख सापडतो. देवस्थानाला यात्रेच्या व नैमित्तिक खर्चासाठी पेशवेकाळात जमिनी ईनाम म्हणून दिल्या गेल्या आहेत. त्यांच्या नोंदी शासन दरबारी देवस्थानाच्या ७/१२ वर अस्तित्वात आहेत. वारळ( श्रीवर्धन/म्हसळा)पासुन मुरुड जवळील मिठागर, खामदे, रहाटाड, मांदाड, उसडी, जमृतखार या अनेक कोळी गावातुन ७० मानाच्या काठ्या तसेच रोहा तालुक्यातुन अनेक काठ्या या यात्रेसाठी दरवर्षी येतात.तळाघर यात्रेत पंचक्रोशीला पंरपरागत मान आहेत.महादेवाडी येथील विश्वकर्मा सुतार देवस्थानाचे पुजारी भगत आहेत, तळाघरच्या पाटील घराण्याकडे दिपमाळ लावण्याचा व निवी येथील बामुगडे घराण्याकडे भगतावर छत्री धरण्याचा मान आहे. सोनगावचे ग्रामस्थ तेळवण ते वरातीपर्यंतचे आमंत्रण देतात.देवाच्या वरातीसाठी पालखीचा मान खारगाव गावाला आहे . बोहल्याचा मान धाटावचे रटाटे घराण्याकडे तर सुतार भगत महादेवाची मूर्ती घेवून विवाहसोहळयासाठी बसतात. तळाघरची काठी करवला व किल्ला गावची काठी करवली असते.तर देवाचा लग्न लावण्याचा मान जंगम समाजाला असतो. वरसगावचा ढोल व सुकेळी ची दिवटी लग्न मुहूर्ताला असणे बंधनकारक असते.या लग्नाचा मुहूर्त काढण्याची अनोखी पद्धत आहे.ज्या दिवशी गुढिपाडवा त्याच वारी पुढिल आठवड्यात रात्री १२ वा.लग्न लागते.त्या दिवशी कोळी काठ्यांचे दुपारी ४ वा.आगमन होते.मानाच्या काठ्यांना मान्यवराचे हस्ते श्रीफळ दिल्यानंतर त्या यात्रेत मार्गस्थ होतात.अशा सर्व काठ्यांची श्रीफळ देवुन भगताकडुन गळाभेट केली जाते.लग्नासमयी सर्व काठ्या मंदिरासमोर उभ्या केल्या जातात.अलोट जनसमुदायाच्या साक्षीने भगवंताचा लग्न सोहळा संपन्न होतो.दुसरा दिवशी दुपारी १ वा. तीर्थाचा कार्यक्रम असतो मानाप्रमाणे सर्व काठ्यांना तीर्थ दिले जाते. व पहाटे ४ वा.सभेना फिरवुन यात्रेची सांगता होते.असख्ख दुकाने , मनोरंजन साधने यांची रेलचेल व लाखोची उलाढाल या निमित्ताने होत असते . म्हणुन प्राचीन संस्कृतीचा ठेवा पाहावयाचा असेल तर तळाघरच्या महादेवाच्या यात्रेला आर्वजुन भेट देण्यासाठी नक्की या असे आवाहन मोंढे कुटुंबीय यांनी केले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close