बुधवारी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विचुंबे पुलाचे लोकार्पण विविध रस्त्यांच्या कामाचेही होणार भूमिपूजन….. 

[avatar]

बुधवारी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विचुंबे पुलाचे लोकार्पण विविध रस्त्यांच्या कामाचेही होणार भूमिपूजन…..

पनवेल (प्रतिनिधी)  पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.  या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

     या पुलासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्‍यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता आणि या कामाला नामदार रवींद्र चव्हाण यांनी मान्यता देत पूर्णत्वास नेले आहे.  या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसर्ली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाच्या लोकर्पणासह विचुंबे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, विचुंबे पोलीस चौकी ते सारनाथ बुद्धविहारकडे तसेच बौद्धवाडा ते ग्रीन व्हॅली पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सुद्धा होणार आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close