महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा या मंडळाचा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक……. 

[avatar]

महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा या मंडळाचा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक……. 

रोहा (संतोष सातपुते)महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यविभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४ यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धे मध्ये रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा या मंडळाचा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. सदर पुरस्काराचे वितरण माननीय सांस्कृतिक मंत्री श्री.सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट चे अध्यक्ष चंद्रकांत पार्टे यांना प्रदान करण्यात आला

रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट ची श्री. चंद्रकांत पार्टे यांनी सलग ३ वर्ष मंडळाचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.३ वर्ष त्यांनी सर्व रोहेकरांची मीटिंग आयोजित करुन अध्यक्ष पदाची जबाबदारी कोणी तरी स्वीकारावी असे मीटिंग मध्ये सांगितलं पण कोणीही पुढे सरसावल नाही. पण त्यांनी ती स्वतः घेतली. कमी कार्यकर्ते असून सुद्धा त्यांनी सर्व काम चोखपणे केलं. ह्या मंडळात आपलं सर्वस्व झोकून काम केलं. सर्व ठिकाणी जाऊन वर्गणी गोळा करणे हे मुख्य काम पण ते त्यांनी सर्वांना सोबत घेऊन स्वतः मेहनत घेऊन केल. त्याचच फळ आज रोहेकराना मिळाल. जुन्या परंपरा आणि नव्या सुधारणा यांचा योग्य तो मेळ घालून हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला. गणेशोत्सवा च्या कालावधीत अनेक कार्यक्रम ठेउन त्यांनी सर्वांना चांगलीच पर्वणी रोहेकराना दिली होती.

रोह्याच्या शिरपेचात या पुरस्काराच्या निमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा चे अध्यक्ष श्री चंद्रकांत पार्टे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सदरचा पुरस्कार हा गणेशोत्सव ट्रस्टचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते,देणगीदार,शासकीय अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,सर्व रोहेकर नागरिक व गणेश भक्त यांच्या सहकार्याने हा मानाचा पुरस्कार आपणास प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार.

सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा याना मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारा मुळे रोहेकाराना मनाचा शिरेटोप प्राप्त झाल्या बद्दल मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. चंद्रकांतजी पार्टे यांचे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व सामाजिक व राजकीय स्तरातील मान्यवरां कडून अभिनंदना चा वर्षाव होत आहे .

.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close