श्रीवर्धन विधानसभेत  अजित पवार गट अदिती तटकरे विरूद्ध शिंदे गट प्रमोद घोसाळकर ??….. 

[avatar]

श्रीवर्धन विधानसभेत  अजित पवार गट अदिती तटकरे विरूद्ध शिंदे गट प्रमोद घोसाळकर ??…..

रायगड(विशेष प्रतिनिधी) लोकसभा २०२४ ला झालेल्या निडणूकीनंतर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पडघम जोरदार वाजायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पक्षपदलाचे वारे जोरदार पहावयास मिळत आहेत. रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार सुनिलजी तटकरे यांचा ८०,००० मतांनी विजय झाला असला तरी संबंध महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यातच वेगवेगळ्या जनमत चाचणीचे सर्वे लक्ष्यात घेता महायुतीला पुन्हा एकदा सत्ता काबीज करणे अवघड झाले आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीचे राजकारण सामान्य मतदारांना पटले नाही हाच त्यामागे अर्थ निगतोय.

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचा अभ्यास केला तर लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सुनिलजी तटकरे यांना जवळपास २८,००० मतांचे लीड मिळाले. गेल्या १५ वर्षापासून सुनिल तटकरे यांचा बालेकील्ला असलेला हा मतदारसंघ असला तरी अपेक्षित यश श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकीत मिळाले नसल्याने स्वत:हा सुनिलजी तटकरे हे समाधानी नाहीत हे त्यांनी देखील अनेक ठिकाणी जाहीर बोलून दाखवले आहे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनवर देखील त्यांना मोठी आगपाखड केल्याचे ऐकावयास आले.
शरद पवारांना मानणारा वर्ग यावेळी त्यांच्याबरोबर नव्हता, परंपरागत मुस्लीम मतदार त्यांच्याविरोधाच उघड नाराजी बोलून दाखवत होता, कुणबी समाजाची असलेली मोठ्या प्रमाणावर मत देखील त्यांना हव्या त्या प्रमाणात घेता आली नाही ही यामागील प्रमुख कारणे.
महायुतीकडून ही उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार असून विद्यमान आमदार अदिती तटकरे यांनाच पक्षाकडून तिकीटमिळेल असे चित्र सध्या आहे. मागील निवडणूकीत शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांचा त्यांनी जवळपास ४०,००० मतांनी पराभव केला होता. पहिल्याच टर्म मध्ये त्यांना प्रथम राज्यमंन्त्री व त्यांनंतर एकनाथजी शिंदे यांच्या मंन्त्रीमंडळात त्यांना कॅबिनेट मंन्त्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली. पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी महाराष्ट्रभर नावलौकीक मिळवला पक्षवाढीसाठी महाराष्ट्रभर दौरे केले परंतु त्यांच मतदार संघांतील जनतेला किती वेळ दिला ?? हे येणारा काळच जनचा मतदानरूपी मतपेटीत देऊन ठरवेल. वडील सुनिलजी तटकरे यांचा दांडगा जनसंपर्क स्वत:हा खासदार, भाऊ अनिकेत तटकरे माजी आमदार. मतदार संघावर गेली पंधरा वर्षे एकहाती वर्चस्व, कार्यकर्ते यांची मोठी फळी या अदिती तटकरे यांच्या जमेच्या बाजू तर घराणेशाही, मित्र पक्षाला विश्वासात न घेणे त्यांना मानसन्मान न देणे या कारणांमुळे विधानसभेला मित्र पक्ष तटकरे यांचे काम करेल असं चित्र सध्या नसल्याने त्यांना या गोष्टींचा नुकसान होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
लोकसभा निवडणूकीत दस्तूरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची उमेदवारी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना जाहीर केली होती. परंतु लोकसभा निवडणूकीत अनंत गिते व नवगणे यांच्यात वाद झाल्याचे त्यांच्याच पधाधिकारी यांच्यकडून सांगितले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणूकीनंतर ते श्रीवर्धन मतदार संघात फिरकले देखील नसल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे त्यातच त्यांच्याच इतर पदाधिकारी यांच्याकडून उमेदवारीची मागणी देखील मध्यंतरी करण्यात आली होती त्यामुळे उमेदवारीसह पक्षबांधणीसाठी एकमत नसलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हा मतदारसंघ विरोधकांना आंदण दिला की काय ? अशी देखील चर्चा निष्टावंत शिवसैनिक करताना दिसत आहेत.
महायुतीच्या माध्यमातून अदिती तटकरे यांचे तिकीट जवळपास निश्चित झाले असले तरीदेखील मागील दोन अडीज वर्षात शिवसेना शिंदे गट मोठ्या प्रमाणात श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात काम करताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनाच पक्षाकडून तिकीट देण्याची मागणी मागील वर्षभरापासून जोर धरत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून सन्मान मिळत नाही, शासनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंन्त्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंन्त्री देवेन्द्र फडणवीस, पालकमंन्त्री उदयजी सामंत यांचा फोटो न टाकता फक्त तटकरे परिवाराचा फोटो टाकला जात असल्याच्या तक्रारी अनेक वेळा झाल्या आहेत. श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या हक्काचा निधी देखील राष्ट्रवादीकडून थांबवला गेल्याचे आरोप व मित्रपक्ष असून देखील शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीकडून पक्षप्रवेश केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे श्रीवर्धन शिवसेना राष्ट्रवादी वाद मोठा उफाळला असून शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी दिसत आहेत. पक्षाकडून घोसाळकर यांच्याच चेहर्यासा सर्वमान्य पसंती दिली जात आहे, गेल्या वर्षभरापासून बूथप्रमुख ते तालुकाप्रमुख संघटना बांधण्यात त्यांना यश आले आहे, मागील विधानसभा निवडणूक त्यांचे बंधू विनोद घोसाळकर यांनी लढविल्याने मतदार संघाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. प्रमोद घोसाळकर यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांतील प्रत्येक तालुक्यात पक्ष बांधणीसाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, बूथ प्रमुख मेळावा, श्रीवर्धन येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्धाटन, श्रीनर्धन शिवसेनेच्या वतीने दहिहंडी उत्सव, म्हसळा शिवसेना पक्षाच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम अश्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम झाले. कार्यकर्ते पक्षाचे काम उत्साहाने करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी त्यांच्या जमेच्या बाजू ठरणार आहेत.
सद्यस्थितीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महत्वाचा विरोधी पक्ष असून देखील पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. परंतु महायुतीतीलच मित्र पक्षाकडून श्रीवर्धन विधानसभा लढविण्याच्या घोषणा होताना दिसत आहेत. त्यापद्धतीचे जोरदार काम सध्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या पक्षातर्फे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. सध्यातरी घोसाळकर यांनी सर्व विरोधकांची मुठ तटकरेंच्या विरोधात बांधल्याने तटकरे विरूद्ध घोसाळकर थेट लढतीत तटकरे विरोधी असलेल्या अनेक मतांचा फायदा घोसाळकर यांना होईल.
खासदार सुनिलजी तटकरे यांचे राजकीय वजन पाहता ते शिवसेना शिंदे गटाला कश्या पद्धतीने शांत करणार की हा संघर्ष विधानसभा निवडणूकीत देखील पहावयास मिळणार हा विषय भविष्यात अजून रंगतदार होणार यात तिळमात्र शंका नाही.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close